.jpeg) |
| विद्युत रोषणाईने झगमगणाऱ्या भव्य छत्राखाली मार्गक्रमण करताना कन्यका मातेची पालखी . |
दिग्रस : आर्यवैश्य समाजाची कुलस्वामिनी माता कन्यका परमेश्वरी यांच्या चैत्र स्थापना उत्सवाला दिग्रस शहरात अत्यंत भक्तिमय, उत्साही आणि मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून संपूर्ण शहर श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक ऐक्याच्या रंगात रंगून गेले. रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता माता कन्यका परमेश्वरी यांच्या पवित्र प्रतिमा व पादुकांची भव्य पालखी शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून जल्लोषात आणि मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली.
या भव्य सोहळ्याने दिग्रसकरांचे लक्ष वेधून घेतले आणि “कन्यका माता की जय” च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे कलश व भगवे ध्वज हातात घेतलेल्या महिलांची दिमाखदार उपस्थिती. आर्यवैश्य समाजातील महिलांच्या लाठी-काठी पथकाने सादर केलेले प्रात्यक्षिक, लेझीम, टाळ-टिपरी पथकांचे तालबद्ध सादरीकरण आणि भजनी मंडळाच्या गजरामुळे वातावरण अधिकच भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले.
तसेच, कन्यका मातेच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या झाकींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. शेकडो आर्यवैश्य समाजबांधव कुटुंबियांसह या शोभायात्रेत सहभागी झाले होते. संपूर्ण मार्गावर सडा-रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आले असून ठिकठिकाणी भाविकांनी मातेच्या पादुकांचे व प्रतिमेचे पूजन करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
मंदिरात पालखी आगमनानंतर सामूहिक महाआरती संपन्न झाली व प्रसादाचे वाटप करण्यात आले. एकूणच, कन्यका परमेश्वरी मातेच्या चैत्र स्थापना उत्सवाने दिग्रस नगरी भक्ती, श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा अनोखा संगम अनुभवत आहे. हा उत्सव भाविकांसाठी केवळ धार्मिक पर्व न ठरता, आध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी सोहळा ठरला आहे.
पालखी शोभा यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री कन्यका परमेश्वरी मंदिराच्या विश्वस्थ मंडळासह आर्यवैश्य समाज मंडळाच्या महिलांनी पुढाकार घेतला होता.
माता कन्यका परमेश्वरी शोभायात्रेची ठळक क्षणचित्रे !
.jpeg) |
| पालखीसमोर कलश घेऊन उपस्थित आर्यवैश्य समाजाच्या महिला. |
.jpeg) |
| लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करताना आर्यवैश्य महिलांचे लाठी-काठी पथक. |
.jpeg) |
| देशभक्तीपर गीतांच्या तालावर सादरीकरण करताना महिलांचे कलश, भगवे ध्वज, लाठी-काठी, लेझीम, टाळ व टिपरी पथक. |
.jpeg) |
| टाळ मृदंगाच्या तालावर फुगडी खेळतांना आर्यवैश्य समाज महिला भजनी मंडळ. |
.jpeg) |
| टिपरी खेळतांना आर्यवैश्य समाज महिलांचे टिपरी पथक. |
.jpeg) |
| आर्यवैश्य समाज महिलांचे भजनी मंडळ |
.jpeg) |
| आर्यवैश्य समाज महिलांचे टिपरी पथक. |
.jpeg) |
| आर्यवैश्य समाज महिलांचे झेंडा पथक. |
.jpeg) |
| कन्यका मातेची वेशभूषा साकारलेल्या चिमुकलीची झाकी. |
.jpeg) |
| माता कन्यका परमेशवरीची सामूहिक महाआरती करतांना महिला. |
.jpeg) |
| माता कन्यका परमेशवरीची सामूहिक महाआरतीस उपस्थित आर्यवैश्य समाज महिला व पुरुष. |
छायाचित्र - रामदास पद्मावार, दिग्रस
0 Comments