.jpeg) |
| श्रीराम मंदिरात सामूहिक आरती करतांना यजमान. |
श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिर व श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिर, ब्राह्मणपुरी येथे श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तीचे पूजन महाआरतीने शोभायात्रेला सुरवात झाली.
.jpeg) |
| शोभायात्रेतील श्रीराम दरबाराचा सुंदर रथ. |
शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेच्या मार्गावर महिलांनी सडा व रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत करून प्रभू श्रीराम चंद्राच्या प्रतिमेचे पूजन केले. या शोभा यात्रेतील रामायण कालीन देखाव्यांनी दिग्रसकरांचे लक्ष वेधले तर तरुणाईने डोक्यावर भगवी टोपी हातात भगवे ध्वज घेऊन जय श्रीराम चा गजर करत ढोल ताशाच्या तालवार बेधुंद होऊन नाचत श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला.
.jpeg) |
| छत्रपती रामायण मंडळाने साकारलेला जटायू वधाचा देखावा. |
आयपीएस परिविक्षाधीन सहाय्य्क पोलीस अधीक्षक तथा ठाणेदार डॉ. तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेऊन डीजेमुक्त मिरवणूक शांततेत पार पाडली.
.jpeg) |
| श्रीराम नामाचा जयघोष करीत ढोलताशाच्या तालावर बेधुंद होऊन नाचताना तरुणाई. |
0 Comments